Anatomy चे इतर भाग मला फार आवडायचे - त्यात embryology आणि genetics होते. या विषयांची आमची अभारतीय पुस्तकही फार छान होती.डॉ. अय्यर embryology शिकवत असाव्यात - अस अंधुकस आठवतंय- खूप छान शिकवायच्या आणि होत्याही खूप छान - अगदी हसतमुख . डॉ .क्रिष्णा genetics शिकवायचे-त्यांचे ( south इंडिअन) उच्चार पटकन समजायचे नाहीत.एकदा त्यांच्या पिरियडला मी पहिल्या बेंचवर बसून झोपा काढत होते म्हणून मला ओरडले होते ! ( एकंदरीत झोपेच दुखणं फार जुनं ! )
पहिल्या वर्षीचा तिसरा विषय म्हणजे Biochemistry ! माझा अत्यंत नावडता विषय !! तेव्हा जर मला कळल असतं की हाच विषय माझा उपजीविकेच साधन होणार आहे तर मी त्याकडे अधिक लक्ष दिल असत !! ( म्हणजे आत्याबाईला मिशा असत्या तर....बोलण्या सारखच आहे ! )खरं तर इतका रटाळ विषय नाही दुसरा medicine मध्ये ! मला कधी तो समजलाच नाही . फार थोडे शिक्षक आठवतायत- तेही फारसे inspiring नव्हते. परीक्षेतही दांडी गुल होता होता राहिली. माझ त्या paper ला घड्याळ बंद पडलं- शेवटी कसबसं - अगदी खराब अक्षर काढत- तो paper पूर्ण केला. हं- तसा अभ्यासही झाला नव्हता - कारण उद्या शेवटचा paper या विचाराने मला आनंदाच्या इतक्या उकळ्या फुटत होत्या की मी मन एकाग्र करूच शकत नव्हते . त्यात गरब्याचे दिवस ! त्यावेळी आमच्या सोसायटीत खूप मोठ्या प्रमाणावर दांडिया व्हायचा - त्यामुळे प्रचंड आवाजही मला ( अभ्यास न करण्यासाठी ) मदत करत होता !
बाकीचे papers , परीक्षा काही केल्या आठवत नाही- practicals ही नाहीत.Term exams च्या आधी धडधडण आठवतंय आणि संपल्यावर - फक्त परीक्षा संपल्याचा आनंद आठवतोय ! सर्व परीक्षा मी पास तर झाले पण कधी चमकले नाही. शाळेत 'आपण हुशार आहोत ' अस वाटण , कधी 'आपण अगदी ढ आहोत ' यात बदललं कळलही नाही - इंग्लिश बोलण्याबद्दलचा न्यूनगंडही होताच .
MBBS मध्ये गेल्यावर पहिल्यांदा train चा प्रवास सुरु झाला. त्या आधी मी ठाण्यातच शिकत होते. आईने मला ट्रेन प्रवासाच्या आधी खूप instrutions दिलेली आठवतात - आपली नेहमीचीच - पिढ्यानपिढ्या आया देत आल्यात तशीच ! ठाणे ते सायन मस्त झोप काढायचे - ( माझ्या गोष्टीत झोप वारंवार येते - जशी मला येते तशीच ! ) पहिल्या दिवसापासून माधुरी आणि मिताली माझ्याबरोबर असायच्या. मग पुढे पुढे आमचा central रेल्वे वाल्यांचा मोठठा ग्रुपच झाला . हळू हळू सर्वांची ओळख झाली आणि आमची batch किती छान , साधी, सरळ आहे हे कळल .
आणखी काही ठळक आठवणी पहिल्या वर्षीच्या -
Social - हे नावच मी इथे येऊन ऐकलं . उत्सुकता होती काय असत त्याची. त्यासाठी रात्री यावं लागणार होतं . हे पहिल social आमच्या senior batch ने आमच्या साठी दिल होतं . सर्वच socials अगदी २-३ वाजेपर्यंत चालायची . त्यानंतर पहाटेच्या पहिल्या ट्रेनची वेळ होईपर्यंत इथे तिथे वेळ काढायचा. ( जेव्हा मी hostel मध्ये राहत नव्हते तेव्हाची गोष्ट ) पहिल्या socialमध्ये मी वर्गात धड कोणालाही ओळखत नव्हते - ते college सुरु झाल्यावर लगेच झाल होतं - पण तरीही मजा आली होती - एक नवा अनुभव होता - रात्रभर नाचण्याचा - ( पुढे दोन दिवस पाय दुखत होते खूप ) काही games , dinner - पण एकंदरीत ओळख करून घेण्यासाठी - social interaction वाढवण्यासाठी म्हणून ते social ( असावं ) मराठी शाळेतून आलेल्या मला थोडा cultural shock असला तरी या पुढची , फक्त आमच्या वर्गाची socials मी खूप enjoy केली.
LTMMC Day साठी झालेली माझी audition - माझ्या मते मी चांगली गायले होते , पण तरीही माझी निवड झाली नव्हती. माझी जवळची मैत्रीण मितालीची निवड झाली - त्यासाठी थोडा आनंद आणि थोडी असूया वाटलेली आठवते ! ( मी " ओ सजना " म्हटल होतं . )
पहिला college फेस्टिवल ज्यातलं फार काहीच आठवत नाही , फक्त एक दिवस थांबून " तेजाब " सिनेमा पहिला होता. तसाच पहिल monsoon melodies - पण त्यात मी बहुदा गायले नव्हते .
पहिला वहिला College day - ज्यात आम्हाला आमच्या seniors ने जे सांगितलं तेच गाणं म्हणायच अशी सक्ती होती. मी , मिताली , आणि उमा - आम्ही तिघींनी " गजर ने किया है इशारा ' हे गाणं - तेही बाळबोध , साड्या बिड्या नेसून म्हटल ! गाणं बर झाल खरं , पण मला ते कधीच फारस आवडलं नाही . ( ही वेशभूषाही seniors चीच idea होती का ? )
Guardian Teacher - ही नवी संकल्पना त्यावर्षी सुरु झाली होती आमच्या college मध्ये ( medical college मधल्या मुलांना फार दडपण येतं - मग त्यांना , त्यांच्या समस्यांबद्दल बोलण्यासाठी , प्रत्येक batch ला एक शिक्षक नेमले होते . आमच्यासाठी होत्या डॉ. पंतवैद्य - ( त्या Anesthesiology च्या professor होत्या ) . आमच्यापैकी कोणीच त्यांच्याकडे कसल्याही समस्या घेउन गेलं नाही ! पण त्यांनी आम्हाला गुरुकृपा मध्ये पाणीपुरी आणि मग Black Current icecream खायला ( कुठे ते आठवत नाही ) नेल. माझ्यापुरत बोलायचं तर मी हे दोन्ही प्रकार पहिल्यांदाच खाल्ले . पण त्यानंतर आजतागायत मागे वळून पाहिल नाहीये ! त्यामुळे आजच्या माझ्या स्वरूपाचं श्रेय त्यांना द्यायला हरकत नाही ! जाता येतं आम्ही चालत जायचो - सायन हॉस्पिटलच्या मागच्या गेटमधून आत जायचो - जाता येता खादाडी करायचो !
पहिल्या वर्षीच्या परीक्षेचं सेन्टर वडाळ्याला होता ( कॉलेजच नाव काय बर होत ? ) येताना आई न्यायला यायची - प्रचंड गर्दी गाडीत - कारण ती ऐन गर्दीची वेळ - जीव मुठीत धरून चढायचो . practicals मुळीच आठवत नाहीत. ही कहाणी ऑगस्ट ९० -डिसेंबर ९१ पर्यंतची .
अशा रीतीने पहिल्या वर्षीची कहाणी सुफळ संपूर्ण जहाली !
Showing posts with label आठवणी. Show all posts
Showing posts with label आठवणी. Show all posts
Sunday, September 13, 2015
Wednesday, August 26, 2015
आठवणी-३
पहिल्या वर्षीचा दुसरा विषय म्हणजे Anatomy.
Anatomy मध्ये अनेक भाग होते- त्यातला एक भाग म्हणजे dissection . खरं म्हणजे तो एक प्रचंड धक्काच असतो आपल्या senses ना ! ती अंधारी dissection room , तिथे पसरलेला तो विचित्र वास ,( जो फोर्मालीन चा होता )आणि विविध आकार आणि रंगांचे मृतदेह. पहिले काही दिवस कोणालाही जेवणच जायच नाही - कितीही धुतले तरी हातांचा तो वास ….दरवळत राहायचा ! माझं पहिल dissection हे lower /inferior extremity ( Infex )अर्थात पायाचं होतं.माझ्या वाट्याला एक अतिशय लठ्ठ बाई आली होती- जिच्या अंगावर एवढी चरबी होती की त्यातून एखादी nerve किंवा blood vessel शोधण फार म्हणजे फारच कठीण काम ! त्यातून आत्तापर्यंत सर्व काही “ शिकवले तरच समजते “ही पक्की खात्री ! त्यामुळे कोणी शिकवणार नाही म्हणजे अतिशय हेल्पलेस वाटायच ! स्व अभ्यास ही संकल्पना डोक्यातही आली नव्हती. dissection हा प्रकार ( Cunningham नावाचा खरं तर खूप चांगल पण त्यावेळी फ्रेंच-ग्रीक वाटणारं ) textbook वाचूनच करायचा ही teachers ची पक्की समजूत झाली होती..
शिक्षकही थोडे दिव्य होते- अगम्य उच्चार , दुर्बोध शिकवणं, अचाट इंग्रजी आणि तोंडात सतत सिगारेट ! Infex मला कधीही नीट समजलं नाही ! पुढे पुढे मात्र “ चौरसिया” नावाच आपल्या मातीतल पुस्तक मिळाल ( जे अक्षरशः एखाद्या गाईड प्रमाणे होतं ) आणि पास होण्यापुरत anatomy यायला लागलं ! सर्वच विषयांची भारतीय पुस्तक मिळाल्याने आम्हा students ची थोडीफार सोय झाली !
superior extremity ( supex) म्हणजेच हात - या dissection ला मात्र चांगले शिक्षक मिळाले, कोणीतरी surgeon होते- नाव आठवत नाही आता-पण आपल्यालाही समजू शकतं असा वाटायला लागलं.thorax ( chest) ला डॉ. शेजवलकर होत्या -त्या lectures मध्ये Genetics शिकवायच्या.- त्यांचाही शिकवणं समाजत असे मला…..थोड्या कापऱ्या- रडक्या आवाजात गाणं म्हणणाऱ्या ( पण त्या सुरात गायच्या एवढा नक्की ! ) -त्यांनी मला एकदा dissection नंतर गाणं म्हणायला लावलेला आठवतंय .( तेव्हा मला गायचा अजिबात confidence नव्हता-मी चांगली गाते असा मला मुळीच वाटायच नाही ! ) त्या स्वतःही एका LTMMC Day ला गायल्या होत्या - ( जिया ले गयो जी मोरा)
पहिल्या भागाला आलेल्या अगम्य शिक्षकांनी मला बराचसा dissection शिकवल( किंवा नाही शिकवलं ! ) त्यामुळेच हा BMR ( basic में राडा ) नावाचा रोग माझ्या वाट्याला आला अशी माझी पक्की खात्री आहे ! ( आता बोलायला काय जातंय ! )
Anatomy साठी आम्हाला Bone set अर्थात हाडांचा सापळा घ्यावा लागे.-तो एक स्वतंत्र अभ्यासच होता- ती हाड शरीरात कशी असतात त्याप्रमाणे धरून दाखवा -अर्थात anatomical position हा प्रत्येक viva मध्ये ठरलेला प्रश्न - ज्याच उत्तर प्रत्येक विद्यार्थी वेगळ द्यायचा ( अर्थात ह्यातही हुशार मुलांच exception होतच ) माणसामाणसामधील वैविध्याचा तो आम्ही घेतलेला मागोवा होता ! ( आमच्या परीने ! ) ट्रेन मध्ये , गर्दीत,ती हाडं हळूच काढून आम्ही अभ्यास करण्याचा नाटक करत इतर प्रवाशांना घाबरवलेल आहे !
Train वरून आठवलं- ट्रेन सुरु झाली की मी नेहमी गाढ झोपून जायचे-आणि उरलेली झोप वर्गात पूर्ण करायचे ! अगदी थोडी हवा जरी लागली तरी डोळे मिटण्याची ती सवय अजूनही कायम आहे !
Tuesday, August 25, 2015
आठवणी २
1st MBBS मध्ये रेश्माच्या बाबांनी आमचा संसार थाटायला मदत केली.ती माझी पहिली ( आणि शेवटचीही )रूममेट .आमच्या खोल्या खरं तर अतिशय भयाण होत्या.toilet बाथरूममध्ये कबुतरं फडफडत असायची.घाण करायची.छपर गळायच पावसाळ्यात , तुटक्या खिडक्यातून आत येणारी धुळच धूळ! सोबतीला उंदीर! छपरसुद्धा बाबा आदमच्या जमान्यातली ! काही केल्या पंख्याचा वारा काही लागायचा नाही.छतावरच्या सळ्यावरून धावणाऱ्या उंदरांची खुडबुड रात्री अपरात्री जाग आणायची.कसे राहायचो आम्ही तिथे देवालाच ठाउक ?
दर बुधवारी आणि शनिवारी मी घरी पळायचे-धुवायच्या कपड्यांचा ढीग घेऊन ! मला खूप होमसिक वाटायच .तसा रोज दुपारी घरून डबा यायचा..ज्यात आईच्या छोट्या छोट्या चिट्ठया असायच्या...मी बरीच वर्ष त्या सांभाळून ठेवल्या होत्या.परत येताना तसेच धुतलेले कपडे bag मध्ये टाकून यायचे- दाराबाहेरच एक इस्त्रीवाला उर्फ Ironman होता ( तो लक्षात राहण्याचा कारण म्हणजे एका Hostel Nite नंतर तो “ आपका neck बहुत अच्छा है “ असा म्हणाला - खूप हसू आलेल मला- माझ्या गात्या गळ्याऐवजी त्याने माझ्या मानेला compliment दिली ! )
१ st MBBS ला दाभोलकर “गुरुजी” होते ...गुरुजी म्हणायचं कारण - त्यांच्या period ला roll number प्रमाणे बसावे लागे….college मधून पुन्हा शाळेत आलो असा वाटायला लागलं मला तेव्हा !पहिल्याच दिवशी stage वर जाऊन स्वतःचा नाव ( आणि काय ? college ? मार्क ? ) माईक वरून सांगावं लागलं. दाभोळकर सर उर्फ Dobby ( आता त्यांना Dobby म्हणायला कसतरीच वाटत !)सर्वांना नावाने ओळखायचे . ८ वाजता sharp ,lecture hall ची दार बंद व्हायची आणि उशिरा येणारे सरळ गैरहजर ठरायचे.आता वाटत की ही शिस्त जरुरी होती...शेवटी आम्ही डॉक्टर होणार होतो..बेशिस्त वागून कसे चालणार होते ?
त्यांचा period ला मला मात्र कायम झोपच यायची ( अजूनही कुठल्याही lecture ला १० मिनिटांच्या वर डोळे उघडे राहत नाहीत माझे !) ते खरं तर न शिकवता direct dictate करायचे. त्यांच्या notes बहुतेक चांगल्या असतीलही पण मी कायम textbook च ( Guyton )वापरले. मधेच प्रश्नही विचारायचे ते- मलाही एकदा जांभया देताना प्रश्न विचारून खाड्कन जाग केलय त्यांनी ! ( पण उत्तर मात्र देऊ शकले नव्हते मी ) ... 1 st MBBS म्हटल की गुरुवर्य दाभोळकरच आठवतात आधी .
त्यांच्या lecture ला उशीर होऊ नये म्हणून आम्ही 7:05 ची ठाणा local पकडायला धडपडायचो.( हे hostel मिळायच्या आधी ) एकदा तर मी धावती local पकडली होती…( त्याच local मध्ये Anatomy चा एक नवा lecturer (? Dr दळवी) होता...आणि “ ही काय विचित्र मुलगी ?” अशा नजरेने माझ्याकडे बघत असल्याचा अंधुकस आठवतंय. त्यांच्या विषयाच्या दर आठवड्याला tests व्हायच्या आणि कमी मार्क मिळाले की शिक्षा ! ( म्हणजे group tutorials) तशा फारशा आठवणी नाहीत त्यांच्या period बद्दल ( फक्त एका मुलीला त्यांच्या period मध्ये उलटीचा त्रास झाला होता आणि त्यामुळे बंद दार काही वेळासाठी उघडली होती ) फक्त एक impression मात्र आहे- शांत , धीरगंभीर आवाजात बोलणारे सर…एकंदरीत physio हा शाळेचाच एक भाग आहे अशी माझी खात्री झाली होती.
पुढे पुढे मला physiology फार आवडायला लागलं.विशेषतः डॉ मालती शिकवायला लागल्यावर तर अधिकच ..अजूनही एक south Indian शिक्षिका होत्या ( नाव विसरले ) ज्या G.I.T. physiology शिकवायच्या..त्याही खूप छान होत्या.
त्या वर्षी Guyton चा “ धोंडा “ घेऊन मी गोव्याला गेले होते...परीक्षा होती मे च्या सुटीनंतर -पण अभ्यास काहीच केला नाही-जो केला तो समजला नाही-आणि जो समजला तो लक्षात राहिला नाही..थोडक्यात काय तर मजेच्या वेळी उगाच अभ्यासाचा आव आणू नये ! काहीही फायदा होत नसतो !
आठवणी- १
2५ एक वर्ष झाली असतील मला , diary लिहायला सुरुवात करून. आधी तर बरीचशी पाने कोरी असायची-दर वर्षी १ जानेवारीला उत्साहाने सुरवात आणि मग हळू हळू ढेपाळत जायचे .नोंदीसुद्धा अगदी विनोदी “ सकाळी उठले. दुध प्यायले.करमचंद पहिले- छान होते “वगैरे वगैरे.कधीतरी शाळेतली भांडणं सुद्धा “ नीलमला ओरबाडले.मग वाईट वाटले.रडले" अशा हास्यास्पद गोष्टी !कधी मिळालेले मार्क, कधीतरी बघितलेले सिनेमे आणि serials. अगदी बारावी होईपर्यंत माझ्या नोंदी तुटक तुटक असायच्या.
मग पुढे MBBS ला प्रवेश मिळाला.- ती पाच वर्ष मी काहीच लिहिलं नाही.खरं तर ते दिवस अत्यंत सुंदर होते - पहिल्यांदाच stage वर गायला लागले ,फार छान मित्र मैत्रिणी मिळाले , थोडा फार ड्रेस सेन्स सुधारला(-मैत्रीणीमुळे अर्थातच ! ) आणि हळू हळू- वर्षभराने का होईना -काय शिकवतात ते कळायला लागले. मी चक्क doctor झाले !!
इंटर्नशिप चा काळ अजूनच मजेदार - आम्हाला त्या Dr. Reddy नी फसवलेच ! ( Reddy च होत न त्यांच नाव ?) एकाच batch मध्ये ठेवतो म्हणून आमच्यातल्या अर्ध्या जणांना वेगळ केलं. तरीही खूप मज्जा केली आम्ही सर्वांनी ! २-३ trips झाल्या- बरेच movies झाले -एक strike सुद्धा झाला मुलुंड ला असताना !
१ ल्या वर्षीच्या आठवणी - किमान पहिल्या सहा महिन्यांच्या तरी - फारशा रंजक नाहीत. तेव्हा अभ्यास समजत नव्हता , राहायला जुन्या होस्टेलच्या barracks होत्या. ठाण्याच्या आम्ही ४ मुली - मी -रेश्मा आणि माधुरी-मिताली.माधुरीशी माझी ओळख झाली ती मी sion हॉस्पिटल ला फी भरायला आले तेव्हा -मी तशी कोणाशीही आपणहून बोलायला जाणार्यांपैकी नव्हते- माधुरी मात्र स्वत:हून ओळख करून घ्यायला आली.
थोड जास्तच पुढे गेले मी- त्याआधी interviews बद्दल -तो दिवस बऱ्यापैकी आठवतोय. नायर हॉस्पिटलच्या auditorium मध्ये आमचे interviews होते -अपर्णा बुधुगुरू ( सर्व उकारांच नाव !) जी त्या दिवशीची पहिली candidateहोती - ती येऊन आपल्या आईला म्हणाली ( थोड्या निराशेतच )” सायन मिळाल “PCB मध्ये ९५ च्या वर मार्क असलेल्या मुलांची अपेक्षा होती की आपल्याला G.S. मेडिकल मिळाव - ते अगदी top choice होतं. मी मात्र आपल्याला admission मिळाल्याच्या खुशीत होते.
आणि अशा रीतीने मी sion ला गेले! माधुरी मिताली शी ओळख झाली and we became very close friends for next 5 years. Off course ,now, for many years I haven’t been in touch with them. But with whatsapp we have reconnected.
.....आणि अशा या आठवणीना उजाळा देण्यास निमित्त म्हणजे एक जुनी diary सापडली मला -एका पावसाळी दुपारी...काहीही उद्योग नव्हता तेव्हा खरडलेली ही काही पाने-पुन्हा पुन्हा वाचायलाही खूप मजा येतेय !
भेटूच पुन्हा !
Subscribe to:
Posts (Atom)